केडीएमसीच्या कोवीड योद्ध्यांना बँक ऑफ बडोदाने गौरवले

बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केला होता कार्यक्रम

डोंबिवली : बँक ऑफ बडोदाच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या कल्याण शाखेने महापालिकेतील फ्रंट लाईनवर काम करणा-या कोव्हिड योंध्दयांचा प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात आला.टाटा आमंत्रा येथे काम करणा-या वैदयकीय अधिकारी डॉ. दिपाली साबळे, महापालिकेचे आरोग्य निरिक्षक बाळासाहेब कंद आणि तिसगाव नागरी आरोग्य केंद्रातील परिचारीका स्मृती गायकवाड यांचा स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. महापालिकेने आम्हाला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे, आणि बँक ऑफ बडोदाने केलेल्या सत्कारामुळे आमचा कामाचा उत्साह वाढला असून यापुढेही आम्ही महापालिकेसाठी असेच काम करत राहू असे उदगार डॉ. दिपाली साबळे यांनी या सत्कार समयी काढले.
कोरोना योध्दयांनी सध्याचा काळात केलेल्या कामाचे आभार मानू तितके कमीच असल्याचे बँक ऑफ बडोदाचे उपमहाव्यवस्थापक अशोक मकवान यांनी यावेळी सांगितले, त्याचप्रमाणे बँकेच्या या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज कोरोना योध्दयांचा सत्कार केल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. बँकेने केलेला सत्कार हा कोरोना साथीचा काळात केलेल्या कामाची पोचपावती असून त्यामुळे महापालिकेच्या कर्मचा-यांना प्रोत्साहन मिळाले असल्याचे उद्गगार महापालिकेचे लेखा अधिकारी विनय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन करतांना काढले. आरोग्य निरिक्षक बाळासाहेब कंद हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत असुन कोवीड महामारीत त्यांच्या कामची दखल घेत बँकेने केलेल्या गौरावाने ते भारावून गेले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उप आयुक्त मिलींद धाट, वैदयकीय आरोग्य अधिकारी सुरेश कदम, वैदयकीय अधिकारी समिर सरवणकर, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 445 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.