सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा विक्रमी निकाल

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

ठाणे : २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील बारावीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात विद्यार्थीसंख्येच्या बाबतीत अतिशय समृद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स.प्र.ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यंदा घवघवीत यश संपादन केले आहे, त्यामुळेच शै.वर्ष २०१८-१९ च्या तुलनेत यंदाच्या निकालात जवळपास ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी, २०१९-२० च्या परीक्षेला महाविद्यालयातील एकूण १९९८ विद्यार्थी ( शाखानिहाय विद्यार्थी- विज्ञान- ५११, कला- ३२२, वाणिज्य- ११६५) बसले. त्यापैकी तब्बल १७६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाचा एकूण ८८.४३ % निकाल लागला. संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान यांनी प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मराठे, उपप्राचार्या प्रज्ञा कानविंदे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गेल्या पाच वर्षात निकालात सतत सकारात्मक वृद्धी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कला , विज्ञान आणि वाणिज्य या शाखांचा शाखानिहाय सरासरी निकाल अनुक्रमे ७१.११%, ८९.२३% आणि ९२.८७% असा आहे. यावेळी विशेष प्राविण्य तसेच प्रथम श्रेणीत ६८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत अनिषा अंजीलीकल या विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थिनीने गंभीर आजाराचा सामना करत असतानाही तब्बल ८६% गुण मिळवून निर्भेळ यश संपादन केले.

 749 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.