१२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल केव्हा लागेल याकडे विद्यार्थ्यांसह सर्व पालकांची उत्सुकता लागू राहीली होती. अखेर १२ वीचा निकाल उद्या १६ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
१२ वीची परिक्षा संपल्यानंतर आणि १० वीची अर्ध्याहून अधिक परिक्षा झाल्यानंतर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे परिक्षेचे पेपर तपासणीपासून सर्वच कामकाज ठप्प झाले. त्यामुळे १२ वी परिक्षा कधी लागेल याबाबत कोणतीच शाश्वती राहीली नव्हती. त्यातच १२ आणि १० वी चा निकाल जून मध्ये लागणार असल्याच्या अफवाही पसरविल्या जात होत्या. अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुढाकार घेत दोन ते तीन वेळा आढावा बैठका घेवून जुलै महिन्यात १२ वी चा निकाल जाहीर करण्याचे धोरण ठरविले. त्यानुसार उद्या १६ तारखेला दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे.

 424 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.