…तर महाविकास आघाडीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

दलितांवरील अत्याचार थांबवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलितांवर; बौद्धांवर अत्याचार वाढले आहेत. दलितांवरील अत्याचार थांबवा ; जर दलितांवरील वाढते अत्याचार थांबवता येत नसतील तर महाविकास आघाडी सरकार ने सत्तेतून बाहेर पडावे त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दलितांवरील वाढते अत्याचार थांबवा; दलितांना संरक्षण द्या ; न्याय द्या या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे अत्यंत शिस्तीत फिजिकल डिस्टन्स पाळून शांततेत आंदोलन करण्यात आले. यावेळी राजगृहावर झालेल्या हल्ल्याचाही निषेध करण्यात आला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. माता रमाबाई आंबेडकर नगरात ११ जुलै १९९७ रोजी झालेल्या गोळीबारकांडात शहीद झालेल्या १० भीमसैनिकांच्या २३ व्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमांना रामदास आठवले यांनी यावेळी अभिवादन केले. ११ जुलै १९९७ रोजी माता रमाबाई आंबेडकर नगरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला त्यात १० भीमसैनिक शहिद झाले. त्या शहिदांच्या २३ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज ११ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. दलितांवरील अत्याचार थांबवा; दलितांना न्याय द्या अन्यथा महाविकास आघाडीने सत्तेत राहू असा इशाराना रामदास आठवले यांनी दिला. रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; ईशान्य मुंबई जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब गरुड;संदेश मोरे; यांच्या नेतृत्वात घाटकोपर पश्चिम सर्वोदय सिग्नल येथे आंदोलन करण्यात आले. तसेच घाटकोपर पूर्व पंतनगर येथे विनय आचरेकर अमिना खान भारती गुरव वर्षा लाड ;पप्पू मोहिते; बाळू निकम;चंद्रकांत न्यायनिर्गुने; अजित बनसोडे; ; अनिल जाधव; मुलुंडमध्ये योगेश शिलवंत; ;सुर्यनगर विक्रोळीमध्ये राजेश सरकार उत्तर मुंबईत हरिहर यादव यांच्या नेतृत्वात दिंडोशी मालाड येथे आंदोलन झाले त्यात तालुका अध्यक्ष हरिभाऊ कोंडे प्रकाश यादव; गुरुदास खैरनार;चंद्रकांत पाटील; वृद्धानंद शिंदे सुनील गमरे आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. अंधेरी एमआयडीसी येथे संजय खंडागळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. मरोळ सहार पोलीस ठाणे येथे रतन अस्वरे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. गोरेगाव येथे रमेश पाईकराव;रेश्मा खान;मलबार हिल येथे सोना कांबळे;कल्याण मध्ये रामा कांबळे आदि अनेक ठिकाणी मुंबईत आंदोलन करण्यात आले. मुंबई बाहेर सोलापूर मध्ये रिपाइं चे राज्य सरचिटणीस राजभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. कोकणात सिंधुदुर्ग येथे रतन कदम यांनी तर कोल्हापुरात उत्तम कांबळे यांनी आंदोलन केले. उत्तर महाराष्ट्र;कोकण;पश्चिम महाराष्ट्र;ठाणे विदर्भ सर्व महाराष्ट्रात आज रिपाइं तर्फे दलितांवर वाढते अत्याचार थांबविण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

 573 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.