आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेचा निर्णय
ठाणे  : ग्लोबल हब येथील मृतदेह अदलाबदलीच्या गोंधळप्रकरणातील दोषींवर कारवाई करतानाच महापालिकेने पारदर्शक बॉडी बॅग व मनगटावर टॅग लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून सुरुवातीपासून पारदर्शक बॉडी बॅगचा मुद्दा सातत्याने मांडला जात होता.
 ग्लोबल हब येथील रुग्णालयात मृतदेह अदलाबदलीच्या गोंधळापूर्वी २ महिन्यापूर्वीही वाशी येथेही मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महापालिकांच्या आयुक्तांना पत्राद्वारे पारदर्शक बॉडी बॅगसाठी आग्रह धरला होता. मात्र, याबाबत निर्णय घेण्यात येत नव्हता. 
 ग्लोबल हब येथील प्रकार उघड झाल्यानंतर, त्यात पारदर्शक बॉडी व मनगटावरील टॅगमुळे ही घटना टाळता आली असती, हे स्पष्ट झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाण्याच्या दौर्यात हा मुद्दा अधोरेखित केला होता.
 ग्लोबल हब येथील घटनेनंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशी झालेल्या चर्चेतही पारदर्शक बॉडी बॅगची गरज व्यक्त करण्यात आली होती. ती मागणी आयुक्तांनी मान्य करून पारदर्शक बॉडी बॅग व मनगटावरील टॅगची तातडीने खरेदी करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
499 total views, 1 views today