कोरोना: २ लाख १७ हजारपैकी १ लाख १८ हजार घरी, मुंबईत ५ हजार मृत्यू

राज्यात २२४ जणांचा मृत्यू तर ५१३४ नव्या रूग्णांचे निदान

मुंबई : राज्यात आज ५१३४ नव्या रूग्णांचे निदान झाले असल्याने एकूण २ लाख १७ हजार १२१ वर रूग्णांची संख्या पोहोचली आहे. तर ३२९६ आज रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. तर २२४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.६% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११,६१,३११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,१७,१२१ (१८.६९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३१,९८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५,४६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात इतर जिल्ह्यांपैकी मुंबईत सर्वाधित मृत्यू झाले असून आतापर्यत ५००२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी आज ६४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

 512 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.