भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : कोरोना लॉकडाऊन मध्ये बंद केलेली सर्व मंदिरे तातडीने उघडण्याची मागणी आज भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मंगलप्रभात लोढा म्हणतात की, राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू झाले आहे. त्याअंतर्गत बाजारपेठ काही निर्बंधांसह पुन्हा हळू हळू सुरू होत आहेत. त्याचबरोबर राज्यात आणि शहरांत बस वाहतूक सुरू केली. प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार सरकार लवकरच हॉटेल आणि उपाहरगृहे सुरू करण्यास परवानगी देत आहे.
त्यापार्श्वभूमीवर भारतीय समाज देवाधर्माशी जोडला गेला आहे. आजच्या संकट काळात या समाजाला मानसिक धार्मिक आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे लोकांसाठी बंद केलेली सर्व मंदिरे तातडीने सामाजिक अंतराचे ध्यान राखत खुली करावी अशी मागणी त्यांनी केली.
552 total views, 2 views today