ब्राम्हण विद्यालयात ऑनलाइन गुरुपौर्णिमा साजरी

शिक्षकांनी मुलांना व्हाट्सअपवर गुरुपौर्णिमेची माहिती व गोष्ट सांगितली

ठाणे : आज गुरुपौर्णिमा शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय प्राथमिक व पूर्व प्राथमिक विद्यालयातर्फे ब्राह्मण शिक्षण मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नम्रता वडे व पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले आणि त्यांच्या सर्व सहशिक्षिकांनी मुलांना व्हाट्सअप वर गुरुपौर्णिमेची माहिती व गोष्ट सांगितली. आई हा आपला पहिला गुरु असतो म्हणून सर्वात आधी आईला वंदन करा आणि त्यानंतर विद्याज्ञान देणाऱ्या गुरू ला वंदन करा असे सांगितले. या ऑनलाइन घेण्यात आलेल्या कार्यक्रमास मुलांनी व पालकांनी छान प्रतिसाद दिला सर्व मुलांनी आईला वंदन केले व व्हाट्सअप वर बाईना फोटो पाठवले काही मुलांनी आपले गुरुं विषयी मनोगत व्यक्त केले. मुलांना शाळेची व शिक्षकांची खुप आठवण येते काही मुलांनी देवबाप्पाला प्रार्थना केली आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने मी बाप्पाला प्रार्थना करतो की करोनाचे संकट लवकर टळू दे आणि आमची शाळा व आमचे मित्र लवकरात लवकर आम्हाला भेटू दे.

 505 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.