क्विक हीलने केले कोविड योध्याना रोगप्रतिकार शक्तीवर्धक औषधाचे वाटप

श्री विश्ववती आयुर्वेदीक चिकित्सालय व संशोधन केंद्रासोबत केली हातमिळवणी

मुंबई : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या अवघड परिस्थितीत डॉक्टर्स, नर्सेस,पोलिस कर्मचारी, स्वच्छता कामगार तसेच वितरक आपले जीव धोक्यात घालून सेवा देताहेत. या पार्श्वभूमीवर क्विक हील सीएसआरने श्री विश्ववती आयुर्वेदीक चिकित्सालय व संशोधन केंद्रासोबत हातमिळवणी करीत जवळजवळ १ लाख कोविड योद्ध्यांना रस माधव वटी या रोगप्रतिकारशक्तीवर्धक औषधाचे वाटप केले आहे.

आयुर्वेदीक औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या या औषधाने सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, थकवा अशा सामान्य विषाणूजन्य संक्रमणाच्या लक्षणांपासून पासून सुरक्षा मिळते. तसेच या औषधाने पचन, रक्तशुद्धी व श्वासोच्छ्वासासंबधीच्या तक्रारीतही लाभ होतो.

क्विक हील टेक्नॉलॉजिजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलाश काटकर म्हणाले, ‘एक जबाबदार नागरिक म्हणून कोविडशी प्रत्यक्ष दोन हात करणा-या आपल्या योद्ध्यांची सुरक्षा पाहणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. ‘कोविड -१९ वॉरियर्सला’आयुर्वेदिक औषधांद्वारे सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्राशी सहकार्य करण्यात आम्हाला आनंद होत आहे. भविष्यात देखील आम्ही देशासाठी लढणाऱ्या योद्ध्यांच्या संरक्षणासाठी असे आणखी संभाव्य पुढाकार घेत राहू.”

‘कोविड-१९ शी लढा देण्यासाठी सेवा कर्मचाऱ्यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत. हे कर्मचारी वारंवार बाधित व्यक्तींच्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांना संक्रमणाचा धोकाही सर्वाधिक असतो. क्विक हीलसोबत आमच्या रस माधव वटी या रोगप्रतिकारशक्तीवर्धक औषधाद्वारे आम्ही त्यांना एक सुरक्षाकवच नक्कीच देऊ शकू. हे औषध कोल्हापूर येथील धर्मादाय संस्था श्री विश्ववती आयुर्वेदीक चिकित्सालय व संशोधन केंद्राने बनवले आहे. आमच्या या पुढाकाराने कदाचित या लढ्यास थोडेसे बळ मिळेल’ असे प्रतिपादन श्री विश्ववती आयुर्वेदीक चिकित्सालय व संशोधन केंद्राचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर यांनी केले.

 348 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.