शेअर बाजारात तेजी

सेन्सेक्सने घेतली ४९८.६५ अंकांची बढत

मुंबई : वित्तीय आणि एफएमसीजी क्षेत्रातील नेतृत्वाखाली आजच्या व्यापार सत्राने सकारात्मक चित्र दर्शवले. निफ्टीने १० हजारांच्या पुढची पातळी कायम राखत तो १.२४% किंवा १२७.९५ अंकांनी वधारला. निफ्टी १०,४३०.०५ अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.४३% किंवा ४९८ अंकांनी वाढून तो ३५,४१४.४५ अंकांवर बंद झाला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १४८६ शेअर्सनी नफा कमावला तर १२० शेअर्स स्थिर राहिले. १२५१ शेअर्सनी मूल्य गमावले. अॅक्सिस बँक (६.३४%), बजाज फिनसर्व्ह (५.२०%), युपीएल (५.२७%), एचडीएफसी (१.२८%), आणि आयटीसी (४.६५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर नेस्ले (२.०६%), एनटीपीसी (२.१४%), श्री सिमेंट्स (१.९६%), एलअँडटी (१.९९%), आणि सिपला (१.८८%) हे टॉप लूझर्स ठरले. फार्मा क्षेत्रावर दबाव कायम राहिला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप हे अनुक्रम ०.१८% आणि ०.३९ टक्क्यांनी वाढले.

हिरो मोटोकॉर्प, हिरो मोटो कॉर्प कंपनीची विक्री ४.५ लाखांनी वाढली. तसेच ग्रामीण आणि निमशहरी भागातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. कंपनीचे स्टॉक्स ०.१२% नी घसरून त्यांनी २५४४.०० रुपयांवर व्यापार केला.

सुझलॉन एनर्जी, पवन चक्की उत्पादक कंपनी सुझलॉन एनर्जीने कर्ज पुनर्रचना पूर्ण करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता ती कर्जावर ९ टक्क्यांनी व्याज देईल. परिणामी, कंपनीचे शेअर्स ९५.९५ टक्क्यांनी वधारले. तसेच त्यांनी ५.३० रुपयांवर व्यापार केला.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स, अमेरिकन न्याय विभगाने जेनेरिक औषधांची किंमत निश्चित करण्याचा कट रचल्याबद्दल कंपनीकडून शुल्क आकारल्यानंतर ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे शेअर्स ३.६२% टक्क्यांनी घसरले व त्यांनी ४३४.०० रुपयांवर व्यापार केला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड: आरआयएलचे स्टॉक्स १.८९ % नी वाढून त्यांनी आजच्या व्यापारी सत्रात १७३६.२५ रुपयांवर व्यापार केला. स्टॉक्सनी इंट्राडेमध्ये उच्च आणि निम्न पातळीला म्हणजेच अनुक्रमे १७२७.९ रुपये आणि १७१२.६५ रुपयांचे मूल्याला स्पर्श केला.

आजच्या व्यापारी सत्रात सकारात्मक इक्विटी मार्केटच्या पार्श्वभूमीवर भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७५.५९ रुपयांची घसरण अनुभवली.

कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने जागतिक अनिश्चितता असूनही सोन्याचे दर वाढले. यावर्षी सोन्याचे दर अंदाजे २४ टक्क्यांनी वाढले आहेत.

भारत-चीनमधील वाढता तणाव आणि कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमध्ये आजच्या व्यापार सत्रात जागतिक बाजारात संमिश्र कल दिसून आला. नॅसडॅक १.८७% तर हँगसेंगने ०.५२% ची वाढ घेतली. तर दुस-या बाजूला निक्केई २२५ चे शेअर्स ०.७५% , एफटीएसई १०० चे शेअर्स १.३३ टक्के तर एफटीएसई एमआयबी चे शेअर्स १.८२% नी घसरले.

 321 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.