कोरोना: उपनगर, पुणे आणि औरंगाबादेत वाढ कायम

२२८५ जणांना घरी सोडले, १८१ जणांचा मृत्यू तर ५२५७ नवे रूग्ण

मुंबई : मुंबई शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या कालच्याप्रमाणे आजही १२०० मध्ये नियंत्रणात आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर व जिल्ह्यात ५८०, नवी मुंबईत २३४, कल्याण डोंबिवलीत ५१३, उल्हासनगर १३७, भिवंडी-निझामपूर १३१, मीरा भांईदर १५०, वसई विरार २८७, रायगड १५३, पनवेल १५८ इतके रूग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे. तसेच मुंबईसह उपनगरात आतापर्यत ५ हजार ५३० जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भागातील एकूण रूग्णांची संख्या १ लाख २२ हजार ३२५ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजाराच्या घरात पोहोचली आहे.
राज्यात आज २३८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ५२५७ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण ८८,९६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.३७ % एवढ्यावर पोहोचले आहे. तसेच आज १८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ७८ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १०३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ % एवढ्यावर पोहोचला असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,४३,४८५ नमुन्यांपैकी १,६९,८८३ ( १८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७४,०९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,७५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगत राज्यातील एकूण रूग्णांची संख्या १ लाख ६९ हजार ८८३ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७३ हजार २९८ वर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

 544 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.