वाढीव वीज बिला विरोधात ठाणे पूर्वमध्ये मनसेचे आंदोलन

वीज बिल कमी करण्याची केली मागणी
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाठवण्यात आलेली भरमसाठ वीज बिल ह्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरी विभागतर्फे मनोहर चव्हाण ह्यांच्या नेतृत्वाखाली जाब विचारण्याकरता महाराष्ट्र विद्युत महामंडळ कोपरी विभागाच्या कार्यालयात धडक दिली व त्यांना वीज बिल कमी करण्याची मागणी केली. कोपरी विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी मनसे पदाधिकारी पुंडलिक घाग , सुनील नाईक, सचिन बेंद्रे , किशोर कदम ,समिशा मार्कडे ,अंकिता सारंग ,चिन्मय महांकाळ ,दिलिप शिंदे, मिलिंद पावसकर हे उपस्थित होते ।

 475 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.