प्रभागात सलग दुसऱ्यांदा मोफत अन्नधान्य वाटप, मास स्क्रिनिंग ,मास वाटप व आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप
नवी मुंबई : कोरोना सारख्या महामारीशी आपण सर्व जण च लढत आहोत. पहिल्या दिवसापासून विविध उपाययोजना प्रभागात सुरू आहेत,तरी त्याच अनुषंगाने सेक्टर १६,१६ ए व १८ नेरुळ मध्ये दुसऱ्यांदा ११५० घरातील रहिवाशांना स्वखर्चाने सरसकट अन्नधान्य वाटप करण्यात आले.त्या प्रसंगी उपस्थित नगरसेवक काशिनाथ पवार,विभागप्रमुख प्रवीण धनावडे,विभागप्रमुख तानाजी जाधव, उपविभागप्रमुख प्रकाश पाटणकर, शाखाप्रमुख सुधाकर सावंत,नामदेव इंगुळकर, जेष्ठ शिवसैनिक जय शिवतरकर,मारुती लोंढे,सुहास सावंत,प्रताप मोरे,सुभाष मानकुमरे, राष्ट्रवादी वॉर्ड अध्यक्ष प्रदीप कलशेट्टी ,अशोक इले,संजय माने,सूर्यकांत देसाई, सूर्यकांत भायदे,नितीन सानप,रवी पवार, रणजित घाडगे,कैलास पाटील, पत्रकार योगेश महाजन,युवा सेना विभागधिकारी विनायक धनावडे,युवा शाखाधिकारी सुनील पाटील, युवा सैनिक चेतन पवार, अनिकेत पवार, प्रतिक विधाते, अनिकेत घोगरे, संदेश सावंत,वेदांत शिंदे, तेजस माने व सोसायट्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सर्वांचे मास स्क्रिनिंग,मास वाटप व आर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे ही वाटप करण्यात आले .
1,322 total views, 1 views today