मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारतीय मराठा संघाने दिले निवेदन
ठाणे : कोरोना महामारी संपुर्ण जगात पसरवून त्याचा शिरकाव आपल्या देशातून महाराष्ट्र राज्यात देखील मोठ्या प्रमाणात हाहाकार सुरू आहे. राज्याला आपल्या सारखे कर्तबगार मुख्यमंत्री लाभल्यामुळेच महाराष्ट्र व विशेष करून मुंबई सारखे दाटवस्तीच्या शहरात आपण स्वतः मुख्यमंत्री या नात्याने आरोग्य विषयक खबरदारी घेऊन अनेक नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे.
लॉक डाऊन काळात आपल्या आदेशानुसार नागरिक आजही पालन करत आहेत. परंतु सदर लॉक डाऊन काळात अनेक नागरिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय बंद पडलेले आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाचा अतोनात सामना करावा लागत असल्याने नागरिकांच्या जवळचे पैसे देखील शिल्लक राहीलेले नाही. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, टोरंट पावर कंपनी तसेच इतर विद्युत कंपन्यांनी लाईट बिले अतिशय भरमसाठ प्रमाणात नागरिकांना पाठवले आहे. यामुळे गोर गरीब जनतेकडील पैसा देखील संपला असल्याचे निदर्शनात येत असल्याने राज्यातील नागरिकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भारतीय मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार, प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे, प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
उदरनिर्वाह बंद असल्याने पैसे नसताना नागरिक कुठून लाईट बिल भरतील, यामुळे आपन महाराष्ट्रातील मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेला मोठा दिलासा देऊन मार्च ते एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट २०२० पर्यंत वीजबिल नागरिकांचे सरसकट माफ करण्याचे अद्यादेश विद्युत कंपन्यांना द्यावेत आणि नागरीकांना संकटाच्या काळात मोठा दिलासा देण्यात यावा. आपण महाराष्ट्राची जबाबदारी घेतल्या पासून राज्यातील गोर गरीब जनतेला वेगवेगळ्या आरोग्य योजनांतून चांगल्या प्रकारे लाभ मिळत आहे. यामुळे आपण नागरिकांच्या हिता करीता एक मोठा निर्णय घेऊन राज्यातील नागरिकांचे वीजबिल माफ करावे आणि ज्यांनी उधार पैसे घेऊन बिले भरले आहे, त्यांचे पुढे येणारे लाईट बिलामधून ती भरलेली बिलाची रक्कम वजा करून देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भारतीय मराठा संघाच्या वतीने अध्यक्ष अविनाश पवार, प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे, प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
497 total views, 1 views today