ठराव करून बंदी आणणारी देशातली पहिलीच नगरपालिका, तात्काळ अमंलबजावणीचा निर्णय
दोंडाईचा : भारत देशात चीनी उत्पादने विक्री करून चीनी कंपन्या अब्जावधी रूपये कमवून त्यावरून हत्यारे बनवून त्याचा वापर आपल्याच देशाच्या सैनिकांच्या विरोधात करतो, शिवाय संपूर्ण जगाला कोरोना सारखी महामारीची उत्पत्ती देखील चीनमध्ये झाली आहे, त्यामुळे गेल्या ४ महिन्यापासून संपूर्ण जग हैराण झाले आहे, त्यामुळे चीन देशाला धडा शिकविण्यासाठी चीनी उत्पादनांवर दोंडाईचा शहरात विक्री करण्यास बंदी करण्याचा ऐतिहासिक ठराव दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांनी आज पालिकेची विशेष सभा घेवून केला आहे. देशात अधिकृत ठराव करून चीनी सामानांवर बंदी घालणारी दोंडाईचा नगरपालिका ही पहिलीच पालिका ठरली आहे.
आज दोंडाईचा पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या समोरील शिवाजी उद्यानात पार पाडली तीत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले सुरवातीला चीनच्या सिमेवर शहीद झालेल्या जवानांना सभागृहात श्रंध्दाजली अर्पण करण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष रवि उपाध्ये, मुख्याधिकारी दिपक सावंत, यांच्यासह बांधकाम सभापती निखील जाधव, नगरसेवक नबु पिंजारी, करणसिंह देशमुख, प्रदीप कागणे, संजय मराठे, सागर मराठे, चिरंजीव चौधरी, राजू भिल, नरेंद्र कोळी, सुफियान तडवी, गिरधारी रुपचंदानी, यांच्यासह वैशाली प्रवीण महाजन, मनीषा जितेंद्र गिरासे, अफ्रिन बागवान, कल्पना नगराळे, सौ पिंजारी, मनीषा नरेंद्र गिरासे, प्रियका ठाकूर, मंगला धनगर, भावना महाले, मनीषा रवींद्र जाधव,सुरेखा संजय तावडे, यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते
विशेष सभेच्या सुरवातीला चीनच्या सीमेवर शहीद झालेल्या वीरांना अभिवादन करम्यात आले त्यानंतर चीन वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला ,सभेत नगरसेवकांनी चीनच्या विरोधी पोस्टर झळकावले आणि चीन चा निषेध नोंदवला
*दोंडाईचा पालिका प्रमाणे इतरांनी देखील तसा ठराव करून चीनला धडा शिकवावा –*
*माजी मंत्री आ जयकुमार रावल*
दरम्यान, दोंडाईचा पालिकेची विशेष सभा आटोपल्यावर पालिकेच्या सत्ताधारी गटाचे प्रमुख माजी मंत्री आ जयकुमार रावल यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला त्यात ते म्हणाले की, चीन मुळे संपूर्ण जगात कोरोना आला एवढेच नव्हे तर चीन च्या वस्तू आमच्या भारत देशात विकत घेऊन आम्ही भारतीय चीनची अर्थव्यवस्था मजबूत करीत असतो, त्याच पैशाने चीन हत्यारे बनवून त्याचा वापर आपल्या देशावर करीत असतो म्हणून चीन ला धडा शिकविण्यासाठी सर्व भारतीयांनी चीनच्या वस्तूंचा बहिष्कार करावा आम्ही दोंडाईचा शहरात यापुढे चीन च्या कोणत्याही वस्तू विक्री करू देणार नाहीत दोंडाईचा प्रमाणे इतर महापालिका, आणि नगरपालिका नी देखील असा ठराव करून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार करावा असे आवाहन माजी मंत्री आ जयकुमार रावल यांनी केले
413 total views, 1 views today