बोगस सिद्धार्थ धुळे विरोधात गुन्हा दाखल

टोरंट कंपनीचा लोगो, बनावट ओळखपत्र बनवून करत होता कंपनीची आर्थिक

ठाणे : टोरंट कंपनीच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून टोरंट कंपनीचा लोगो वापरत कॉन्ट्रॅक्ट घेतल्याचे भासवून कंपनीची आर्थिक लूट करणाऱ्या एका इसमाविरोधात मुंब्रा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या इसमाविरोधात भारतीय दंड संहिता १८६० अनव्ये ४६५, ४६८ आणि ४७१ कलम लावण्यात आले आहेत.
टोरंट कंपनीचे सुपरवायझर अनिल खारे यांच्या कानावर अशा प्रकारे कंपनीचा लोगो वापरून सिद्धार्थ धुळे हा युवक फसगत करत असल्याचे निदर्शनात येताच त्यांनी खातरजमा करून मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ( फिर्याद) दाखल केली.

सिद्धार्थ हा डायमंड इलेक्ट्रिकल या नावाचे इलेक्ट्रिकचा लायसन्स होल्डर असल्याचे भासवून कंपनीची आर्थिक लूट करत होता. त्याने कंपनीच्या नावाचे ओळखपत्र बनवले होते. शिवाय कंपनीचा लोगो देखील वापरला होता. या प्रकरणातील पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गायकवाड करत आहेत. टोरंट कंपनीच्या नावाचा कोणी गैरवापर केल्यास त्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे.

 353 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.