कोरोनाग्रस्तांची वाढत्या संख्येमुळे सरकारकडून बदल्या
मुंबई : मुंबई शहराबरोबर उपनगरातील नवी मुंबई, मीरा भांईदर आणि उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर या ठिकाणच्या तिन्ही महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची नवी मुंबईच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. तर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.विजय राठोड यांची मीरा भांईदर महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.मंतदा राजा दयानिधी यांची उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त करण्यात आली.
याशिवाय आयपीएस अधिकारी डॉ.संतोष रस्तोगी यांची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अतिरिक्त निवासी आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.
648 total views, 2 views today