१२ वी निकाल १५ जुलै पर्यत , तर १० वीचा जुलै अखेरपर्यत जाहीर होणार


बोर्ड अध्यक्षा काळे यांची माहिती

मुंबई : राज्यात ऑनलाईन शैक्षणिक वर्ग सुरु झाल्यानंतर आता १० आणि १२ वी चा निकाल कधी जाहीर होणार याबाबत वेगवेगळ्या तारख्या परसविण्याचे पेव फुटले होते. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शंखुतला काळे यांनी १० वीचा निकाल जुलै अखेर पर्यंत तर १२ वीचा निकाल १५ जुलै पर्यत जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
ऑनलाईन शिक्षणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. त्यावेळी काळे यांनी वरील माहिती दिली.
यंदा मार्च २० च्या दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते. मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून जुलै १५ पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करणार असून ९७ टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

 356 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.