कोरोना योद्ध्यांसाठी जेवणासह हॕण्डग्लोजचे वाटप

रायझिंग स्टार्स नर्सरी शाळेचा अभिनव उपक्रम


ठाणे : कळवा परिसरात सातत्याने उपक्रमशील असणाऱ्या रायझिंग स्टार्स शाळेच्या वतीने कळवा परिसरात कोरोनाच्या लढाईत खंबीरपणे लढणा-या पोलिस कर्मचारी बांधवांना जेवणाचे पार्सल डबे पुरविण्यात आले. तसेच पोलिस बंधू व भगिनींसाठी हाताचे ग्लोजचेही वाटप करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना रायझिंग स्कूलच्या मुख्य संचालिका ममता महेश मसूरकर म्हणाल्या की,
“सद्या दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे आणि ह्या भयानक परिस्थितीत आपले हितचिंतक, जी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी अहोरात्र देशसेवा करतात असे आपले डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार तसेच पोलीस बंधू-भगिनी हे थोर व्यक्ती सारखे चोवीस तास काम करत आहेत. आपण घरातच थांबून देशसेवा करुन अशा लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सहाय्य करु शकतो. आपल्याला घरातूनच या महात्म्यांसाठी काहीतरी मनापासून करावे असे सतत वाटत असल्यामुळे आपल्या पोलिस बंधू-भगिनी साठी हॅन्ड ग्लोज व पोळी-भाजीची सेवा करण्याचे ठरवले. यासाठी रायझिंग स्टार्स नर्सरी शाळेच्या पालक वर्गाने तसेच माझ्या कुटुंबाने महत्त्वाची मदत केली. त्यामुळेच मी हे सगळे करू शकले ही सेवाभावी वृत्ती सगळ्यांच्या अंगी यावी म्हणून आम्ही कळवा परिसरातील इतर बांधवांनीही सामाजिक बांधिलकी जोपासावी.” असेही आवाहन पोलिस मित्र असणाऱ्या ममता मसूरकर यांनी केले .
यावेळी उपस्थित पोलीस मित्र महेश मसुरकर, पत्रकार अमोल कदम, राष्ट्रीय सेवा संघाचे अरुण सांबरे उपस्थित होते.

 376 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.