मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केली लक्ष देण्याची मागणी
मुंबई : मुंबईसह राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलीय. ऑक्सीजन न मिळाल्यामुळे कोरोनारूग्णांचा मृत्यू ही त्याचेच द्योतक असून आजही या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत अजूनही पारदर्शकता नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत या गोष्टींकडे लक्ष देण्याची मागणी आज पत्र पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
१९ जून २०२० रोजी राज्यात सर्वाधिक रूग्ण ३८२७ इतके झाले. त्यात एकट्या मुंबईचा वाटा ११४ इतका आहे. राज्यातील आकडेवारीचा विचार केला तर एकट्या मुंबईचा वाटा हा ५२.१८ टक्के इतका आहे. तर मुंबई महानगराचा विचार केला तर तो ७३.८५ इतका आहे. मृत्यूचा याशिवाय मुंबईचा मृत्यू दर हा ५.२७ टक्क्यावर पोहोचला असल्याचे ते म्हणाले.
जून महिन्याच्या पहिल्या १८ दिवसात ४३.८६ टक्के रूग्ण वाढले तर मुंबईत ३६.८८ टक्के वाढल्याचे निदर्शनास आणून देत बळींच्या संख्येतही ३७.१६ टक्के इतकी वाढ झाली आहे. या परिस्थितीही मुंबईत मृतकांची संख्या लपविली जात असल्याने कोरोनाविरूध्दच्या या युध्दात तरी किमान राज्यातील जनतेला पारदर्शीपणे आकडेवारीची माहिती द्या अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली.
627 total views, 1 views today