एक तृतीयांशांपेक्षा जास्त इंजिनिअरिंग पदवीधरांना नोकरीची चिंता

कॅम्पस प्लेसमेंटची सुविधा असूनही ७६% उमेदवारांना नोकरी मिळविण्यात अडचणी – ब्रिजलॅब्ज सर्वेक्षण

मुंबई : साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदी असून बहुतांश संस्थांनी त्यांची भरती प्रक्रिया थांबवली आहे किंवा कर्मचारी कपात करत आहेत. या सध्याच्या अडचणीमुळे नव्याने इंजिनिअर झालेल्या पदवीधारकांना संधी शोधत असताना योग्य वेळेत नोकरी मिळण्याकरिता अडचणी येत असल्याचे भारतातील सर्वात मोठ्या आयपी संचलित इन्क्युबेशन लॅब ब्रिजलॅब्ज सोल्युशन एलएलपीद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमधील जवळपास १००० च्या आसपास (६० % मुले आणि ४०% मुली) विद्यार्थ्यांदरम्यान केल्या गेलेल्या या सर्वेक्षणातून नोकरीच्या शोधात असणा-यांच्या काही प्रमुख अडचणी समोर आल्या आहेत.

या सर्वेक्षणाद्वारे, आपल्या साथीच्या आजारानंतरच्या जगात इंजिनिअर्सना ‘जॉब रेडी’ बनवण्यात कौशल्यातील तफावत भरून काढण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली. प्रतिसाद दिलेल्यांपैकी ७६% विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये सक्रिय प्लेसमेंट विभाग असल्याचे कबूल केले तर इतरांनी वेगळे मत मांडले. बहुतांश विद्यार्थ्यांनी सक्रीय प्लेसमेंट विभाग असल्याचे मान्य केले असले तरीही, एक पंचमांशांपेक्षा जास्त म्हणजे २४% विद्यार्थ्यांनी त्याद्वारे नोकरी मिळण्याकरिता ते पात्र असल्याचे सांगितले, हे महत्त्वाचे आहे. यातून असे सूचित होते की, तब्बल ७८.६४% विद्यार्थ्यांकडे सध्या कोणतीही नोकरी नाही.

सर्वेक्षणानुसार, ३५.४८% नोकरी शोधणारे इंजिनिअर्स वेळेवर नोकरी लागण्याबाबत चिंतेत आहेत. इप्सित पॅकेजपासून ते नोकरीच्या संधीचा स्रोत इथपर्यंत असंख्य विषयांभोवती त्यांना भीती आहे. विशेष म्हणजे प्रतिसाद दिलेल्यांपैकी २६.९६% पदवीधारकांनाच त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांच्या बळावर इप्सित पॅकेज मिळण्याचा आत्मविश्वास आहे, हे अधोरेखित करणे गरजेचे आहे. नोकरी शोधणा-यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनुभवात्मक शिक्षणासह मजबूत कौशल्य महत्त्वाचे आहे, हेदेखील आकडेवारीवरून दिसून येते.

ब्रिजलॅब्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण महादेवन म्हणाले, “या सर्वेक्षणातून अनेक विचार करण्याजोगे मुद्दे समोर आले. पहिले म्हणजे, सर्वच इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंटची सुविधा नाही. दुसरे म्हणजे, अशा प्रकारच्या सुविधा खात्रीशीर नाहीत. सध्याच्या आर्थिक मंदीमुळे भरती प्रक्रियेला अचानक विराम मिळाल्याने ही स्थिती आहे. अखेरचे आणि मुख्य म्हणजे, नोकरी शोधणा-यांना अपेक्षित मोबदल्यासह लवकरच नोकरी मिळेल का याचा आत्मविश्वास नाही.”

“सध्याची स्थिती पाहता, नोकरी शोधणा-यांसाठी एखाद्या मजबूत कौशल्य समूहांची गरज आहे. जेणेकरून त्यांना या स्पर्धात्मक बाजारपेठेत प्रवेश मिळण्याची खात्री मिळेल, तसेच त्यांच्या मेहनतीनुसार, त्यांना योग्य इच्छित पॅकेज मिळू शकेल,” असे महादेवन पुढे म्हणाले.

 515 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.