ठाणे काँग्रेस ओबीसी विभागातर्फे वन अधिकारी, रक्षकांना सुरक्षा साधनांचे वाटप

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता उपक्रम

ठाणे : ठाणे कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.लॉकडाउनच्या काळात ठाणे कॉंग्रेस ओबीसी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले व काही उपक्रम अजूनही राबविण्यात येत आहेत.आज काँग्रेस नेते राहुलजींच्या वाढदिवससनिमित्त प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे व ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा इंटक कांग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे शहराला निसर्गाची देणगी म्हणून लाभलेले येऊर वनक्षेत्र परिसरांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले व येऊर गेट येथे कार्यरत असलेले वन अधिकारी व वनरक्षक यांना सनीटायझर,सेफ्टी गॉगल,फेस शील्ड,हॅन्ड ग्लोज,N95 मास्क यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना राहूल पिंगळे यांनी सांगितले की सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत पर्यावरण संवर्धनाचा हेतू साधत वृक्षारोपण व आपल्या वनांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेले वनरक्षक यांना करोना काळात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त साहित्य देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने राहुल गांधी यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी वनाधिकारी राजेंद्र पवार, कोळी व इतर कर्मचारी यांच्यासह कांग्रेसचे श्रीकांत गाडीलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते

 517 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.