एंजल ब्रोकिंगद्वारे ‘अँप्लीफायर्स’ची सुरुवात

सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सना थेट ब्रँडशी संवाद साधण्यास सक्षम बनवतो

मुंबई : देशाच्या ब्रोकिंग विश्वात होणारी वाढ लक्षात घेत एंजल ब्रोकिंगने आता भारतात पहिला अँप्लीफायर प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील मिलेनिअल्सच्या पिढीला देशातील स्टॉक ट्रेडिंगची वाढती लोकप्रियता आत्मसात करण्याचे सामर्थ्य मिळेल. तसेच डायरेक्ट ब्रँड सहयोग आणि सर्व शक्तीशाली प्रभावी प्रणालीद्वारे उल्ललेखनीय सामग्री तयार केली जाईल.गुंतवणुकीसंबंधीच्या सर्व अडचणी दूर करणे हाच अॅँप्लीफायर प्लॅटफॉर्मचा उद्देश असून इंफ्लूएंसर्सना निवडक ऑफर्स, सामग्रीची लायब्ररी वापरण्यास, ब्रँड ब्रिफ्स आणि वापरण्यास सुलभ अशा प्लॅटफॉर्म आधारीत टेम्पलेट्स पुरवतो.

एंजल ब्रोकिंग हे तंत्रज्ञान तसेच डिजिटल माध्यमांना प्राधान्य देत भारतातील गुंतवणुकीच्या सवयी बदलण्याच्या प्रवासावर आहे. या वर्षातील मार्चपासून प्लॅटफॉर्मने दर महिन्याला सरासरी १ लाखाहून अधिक ग्राहक जोडले आहेत. समर्पित प्रभावशाली चॅनल लाँच केल्यानंतर संपूर्ण देशभर उद्देशित संवादासह राष्ट्रीय पातळीवर पोहोच वास्तविकदृष्ट्या विस्तारण्याचा प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ प्रभाकर तिवारी म्हणाले, “एंजल ब्रोकिंगमध्ये आम्ही बाजारातील उणीवा दूर व्हाव्यात, लाभदायक संधींना प्रोत्साहन मिळाले तसेच रिटेल इक्विटी गुंतवणुकीभोवतीची डिजिटल प्रणाली मजबूत व्हावी, यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आमचा अँप्लीफायर्स प्लॅटफॉर्म लाँच करण्यामागे हाच हेतू आहे.”

 440 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.