आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन साजरा करणार

रेल चाईल्ड संस्था संचालित रेल चाईल्ड प्राथमिक शाळा,
महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेने आयोजित केला उपक्रम


डोंबिवली : २०१५ पासून जगातील सर्व देशांमध्ये “२१ जून” हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून साजरा केला जातो.  २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.  पतंजली मुनींनी सुरू केलेली योगविद्या” ही शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक साधना असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

हे लक्षात घेऊन रेल चाईल्ड प्राथमिक शाळा व महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली या शाळेच्या माध्यमातून रविवार  २१ जून  रोजी सकाळी ठिक ७ ते ७:४० या वेळेत  “आंतरराष्ट्रीय योग दिन”आॅनलाईन साजरा करण्याचे योजले आहे.  या योग दिनाची जय्यत तयारी व नियोजन करण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षिका व योग मार्गदर्शिका  सविता सुर्यकांत खुसपे यांनी स्विकारली आहे.  आंतरराष्ट्रीय योग दिनी सर्वांना, सुयोग्य पद्धतीने सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम करता यावा, हे लक्षात घेऊन  १८ ते २० जून असे तीन दिवस आॅनलाईन सराव सुरू केला आहे.

सर्वांना योगासने व सर्व शारीरिक क्रिया सुस्थितीत करता याव्यात, यासाठी  सविता खुसपे आणि त्याच्या कन्या  प्रतिक्षा व स्नेहा यांच्या सहकार्याने व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडिओ शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना मार्गदर्शक ठरेल.
या योग दिनी रेल चाईल्ड संस्था पदाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शाळा समिती अध्यक्ष व सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक प्रतिनिधी हे आपापल्या निवासस्थानी सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम करणार आहेत.

 590 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.