डोंबिवलीत चीनचा प्रतिकात्मक झेंडा जाळला

चीनच्या दुष्कृत्याचा भाजयुमो डोंबिवली पूर्व मंडल कडून निषेध

डोंबिवली : लडाख मधील गालवान व्हॅली येथे चीन सैन्याने भारतीय जवानांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा भाजयुमो डोंबिवली पूर्व मंडल कडून निषेध करण्यात आला. वीरगती प्राप्त झालेल्या भारतिय जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. ह्या हल्ल्याच्या निषेधार्थ चीनचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळून रोष व्यक्त करण्यात आला.भाजयुमो डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी ह्यावेळी बोलताना सांगितले की, ह्या आव्हानात्मक प्रसंगी सर्व भारतीय तरुण, भारत सरकार आणि भारतीय जवानांसोबत आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. चीन असो वा पाकिस्तान, घुसखोरी आणि दहशतवाद ह्याबद्दल आपले ‘झिरो टॉलरन्स’ हेच धोरण असले पाहिजे.ह्यावेळी कार्यालयमंत्री सौरभ ताम्हणकर, अथर्व ताडफळे, मंदार जोशी, रोहन देसाई, राजा सिंघानी, श्रेयस मानकामे, चिन्मय कामतेकर, भूषण देव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 597 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.