अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

अध्यक्षांसह तीन ठिकाणी महिला सदस्य होणार सभापती

ठाणे :  ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पाच पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज एन.के. टी. सभागृह,  ठाणे येथे जाहीर करण्यात आली. 

यावेळी उप जिल्हाधिकारी ( प्रशासन) अभिजीत भांडे पाटील यांनी उपस्थितांना आरक्षण सोडत प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी तहसीलदार ( सर्वसामान्य) राजाराम तवटे,  राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मा. विधानसभा सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. ही प्रक्रिया कोव्हिडं-१९ बाबत शासन निर्देशांचा अवलंब करून मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आली होती.

आरक्षण खालील प्रमाणे

१)    अध्यक्ष जिल्हा परिषद, ठाणे
   नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ( महिला)

२)       पंचायत समिती, शहापुर
       अनुसूचित जमाती ( महिला )

३)    पंचायत समिती, अंबरनाथ
       अनुसूचित जमाती ( महिला )

४)     पंचायत समिती, मुरबाड
          नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 

५)    पंचायत समिती,कल्याण
           सर्वसाधारण (महिला)
      
६)      पंचायत समिती, भिवंडी
             सर्वसाधारण

 488 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.