एमजी मोटरच्या ‘हेक्टर प्लस’च्या उत्पादन सुरूवात

जुलै महिन्यामध्ये येणार बाजारात

मुंबई : एमजी मोटर इंडियाने बहुप्रतीक्षित अशा हेक्टर प्लसचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले. हलोल येथील अत्याधुनिक प्रकल्पात तयार झालेली हेक्टर प्लस ही ऑटोएक्सपो २०२० मध्ये सर्वप्रथम सादर करण्यात आली होती. जुलै महिन्यामध्ये ती विक्रीस उपलब्ध असेल.

हेक्टर प्लस ही वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण ती भारतातील पहिली इंटरनेट कार आहे. कारच्या मधल्या रोमध्ये कॅप्टन सीट आहे. त्यामुळे प्रवाशांना सर्वोत्कृष्ट आरामाचा अनुभव मिळेल. कौटुंबिक गरजांसाठी तिस-या रोचाही समावेश करण्यात आला आहे. ही हाय अपिल एसयूव्ही नव्या प्रीमियम लुकमध्ये असेल. यात हेडलँप्स, फ्रंट ग्रिल, फ्रंट आणि रिअर बंपर्स, नवी रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिव्हाइज्ड स्कीड प्लेट्स असतील.

एमजी मोटर इंडियाचे प्रमुख प्रकल्प अधिकारी मनीष मनेक म्हणाले, “हेक्टर प्लस ही विशेषत्वाने कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली असून यात मधल्या रोमध्ये कॅप्टन सीट असून तिसऱ्या रोमध्ये किशोरवयीन मुलांसाठी जागा आहे. हेक्टर ब्रँडच्या फॅमिलीत समाविष्ट झालेली हेक्टर प्लस ही आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट आणि अतुलनीय आरामदायी असल्याने ती स्मार्ट चॉइस असेल.”

सध्याच्या नियमांसह उत्पादनासंबंधी नियमांचे पालन करून एमजीचा हलोल येथील प्रकल्प जागतिक स्तरावरील उत्पादन मानदंडांनुसार काम करीत आहे. वाहनांची विविध प्रकारे कठोर चाचणी घेतण्यात आहे. विशेषत: भारतासाठी उत्पादने तयार करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या कारनिर्माता कंपनीने प्रकल्पात कॅप्टिव्ह व्हेंडर पार्कदेखील उभारले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या गुजरातमधील प्रकल्पात आधुनिक रोबोटिक स्पॉट वेल्डिंग, रोबोटिक रोलर हेमिंग आणि रोबोटिक ब्रेझिंग फॅसिलिटीज असून याद्वारे सर्वोत्कृष्ट वेल्डिंग आणि डायमेंशनल कंसिस्टन्सी मिळते. यातील पेंट शॉपमध्ये उत्तम पेंट फिनिश मिळवण्यासाठी तसेच रंगसंगती साधण्यासाठी कोटिंगचे सर्व टप्पे रोबोटिक अॅप्लीकेशनद्वारे पार केले जातात.

 402 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.