छोटा शकीलच्या पाच भावंडांपैकी हमीदा दुसऱ्या क्रमांकाची बहीण होती.
ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचे मुंब्रात मंगळवारी सकाळी कोरोना आजारामुळे मृत्यू झाला आहे. हमीदा फारूक सैय्यद (50) असे शकिलच्या मयत झालेल्या बहिणीचे नाव असून तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास हस्तक छोटा शकीलची मीरा रोड येथे राहणारी लहान बहिण फहमिदा हिच्या मृत्यूला महिना उलटण्याआधीच मोठी बहिण हमीदा हीचाही मृत्यू झाला आहे. हमीदा आपल्या पतीसह मुंब्रा येथे राहत होती. तीला गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिला मुंब्रातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच प्रकृती बिघडल्याने मंगळवारी सकाळी हमीदा हिचा मृत्यू झाला. छोटा शकीलच्या पाच भावंडांपैकी हमीदा दुसऱ्या क्रमांकाची बहीण होती.
512 total views, 1 views today