चीनच्या कपट युद्धनीतीला चाणक्यनीतीने उत्तर द्या

चीनच्या आक्रमणात हुतात्मा झालेले कर्नल आणि 2 सैनिक यांना हिंदु जनजागृती समितीची श्रद्धांजली

मुंबई : लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये चीन आणि भारत यांच्या सैन्य चकमकीत भारताचे १ कर्नल आणि २ सैनिक हुतात्मा झाले आहेत. हिंदु जनजागृती समिती चीनच्या या कपटी कृत्याचा जाहीर निषेध करते. भारत सरकारने देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, तसेच चीनच्या कपट युद्धनीतीला चाणक्यनीती आणि गनिमीकावा या युद्धनीतीने कणखरपणे उत्तर द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केंद्र सरकारला केले आहे. चीनविरोधात मोदी सरकार जे धोरण अवलंबेल, त्याला भारतीय जनतेचा ठामपणे पाठिंबा राहील. भारतीय सेना सीमेवर लढत चीनला अद्दल घडवेलच, पण प्रत्येक भारतियाने चीनी वस्तूंवर बहिष्कार घालत स्वदेशाभिमानाद्वारे युद्ध लढून चीनला सर्वच स्तरांवर नामोहरम करावे, असेही हिंदु जनजागृती समितीने आवाहन केले आहे.

 501 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.