कलादालनाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सचिन जुवाटकर यांनी रेखाटले शरद पवारांचे चित्र सचिन जुवाटकर यांनी रेखाटले
बदलापूर : बदलापूर येथील “सचिन जुवाटकर कलादालना”चा दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सचिन जुवाटकर यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे तब्ब्ल आठ तासात चित्र रेखाटले. सचिन जुवाटकर यांच्या या फेसबुक लाइकला हजारो रसिकांनी प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सचिन जुवाटकर यांनी “लक्ष्य कोरोनाचे, शस्त्र कुंचल्याचे” हा उपक्रम गेले तीन महिने राबविला. त्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे चित्र रेखाटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी जुवाटकर याना हि विनंती केली होती.
सचिन जुवाटकर यांचे नाव कलाक्षेत्रात नवीन नाही. जागतिक दर्जाच्या चित्रकाराची कला अवगत केलेले, व हातात कुंचल्यांची जादू असणारे, सचिन जुवाटकर हे बदलापूरचे भूषण. जागतिक कीर्तीच्या सचिन जुवाटकर यांच्या कला दालनाला २ वर्ष पूर्ण झाली. कलादलानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांचे हुबेहूब चित्र त्यांनी रेखाटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी सचिन जुवाटकर यांना शरद पवार यांचे चित्र रेखाटण्याची विनंती केली होती. सचिन जुवाटकर यांनी सलग ८ तास बसून हे चित्र रेखाटून पूर्ण केले.
कोरोनाची संचार बंदी सुरु झाल्यानंतर सचिन जुवाटकर यांनी “लक्ष्य कोरोनाचे, शस्त्र कुंचल्याचे” हा उपक्रम गेले तीन महिने राबविला. या तीन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मसालाकिंग धंनजय दातार यांची रेखाचित्रे रेखाटली. गेल्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे चित्र रेखाटले. हि चित्रे रेखाटतांना ते फेसबुक लाईव्ह करीत असतात. परिणामी या चित्राचा मनमुराद आनंद या क्षेत्रातील रसिक जगभरातून घेत असतात. असंख्य चित्रकार त्यावेळी प्रत्यक्ष चित्र काढून जुवाटकर याना शुभेच्छा देत असतात.
शरद पवार हे कलेचे चाहते व कला जोपासणारे राजकीय व्यक्तिमत्व असून, त्यांनी आमच्या सारख्या कलाकारांना प्रोत्साहन देत कलाक्षेत्रात अनेक संधी उपलब्ध करून दिली असल्याचे मत, यावेळी सचिन जुवाटकर यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या या महामारीच्या काळात नागरिकांनी स्वतःच्या घरात रहावे हि कळकळीची विनंती शासन करीत आहे. घरात बसलेल्या रसिकांना आपणाकडून काहीतरी देता यावे या हेतूने हा उपक्रम सुरु केला आणि जगभरातून असंख्य रसिकांनी साथ दिली असल्याचे सचिन जुवाटकर यांनी सांगितले.
आमचे प्रेरणास्थान शरद पवार यांचे रेखाचित्र बदलापूर मधील चित्रकाराने रेखाटले आहे. हे चित्र शरद पवार यांची वेळ घेऊन त्यांना भेट देण्याचा मनोदय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी व्यक्त केला.
442 total views, 1 views today