डब्ल्यूडब्ल्यूआयद्वारे ऑनलाइन प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर

डब्ल्यूडब्ल्यूआयमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसशी संलग्न डिप्लोमा अभ्यासक्रम राबवले जातात.

मुंबई : व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय) या आशियातील प्रीमिअर फिल्म, कम्युनिकेशन आणि क्रिएटिव्ह आर्ट्स इन्स्टिट्यूटने २०२० अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांच्या चौथ्या फेरीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. डब्ल्यूडब्ल्यूआयच्या पूर्ण वेळ डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांसाठीची नोंदणी २२ जून २०२० रोजी बंद होणार असून ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया अनुक्रमे २५ आणि २६ जून २०२० होतील. हे अभ्यासक्रम वर्ग ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहेत. डब्ल्यूडब्ल्यूआयमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसशी संलग्न डिप्लोमा अभ्यासक्रम राबवले जातात.

२५ जून २०२० रोजी बीएससी/बीए फिल्ममेकिंग, अॅडव्हान्स डिप्लोमा इन फिल्ममेकिंग, बीए स्क्रीनरायटिंग, डिप्लोमा इन स्क्रीनरायटिंग, बीए अॅक्टिंग, अॅडव्हान्स डिप्लोमा इन अॅक्टिंग या विषयांच्या परीक्षा घेण्यात येतील तर २६ जून रोजी बीए इन म्युझिक प्रोडक्शन अॅण्ड कम्पोझिशन, बीबीए मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन इव्हेंट मॅनेजमेंट अॅण्ड एक्स्पिरन्शिअल मार्केटिंग, बीएससी/बीए+पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लेमा इन अॅनिमेशन, इंटीग्रेटेड बीएससी/बीए+पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन गेम डिझाईन, इंटीग्रेटेड बीएससी/बीए+पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन व्हिज्युअल कम्युनिकेशन डिझाईन आणि बीए इन फॅशन डिझाईन या विषयांच्या परीक्षा घेण्यात येतील.

 483 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.