नवी मुंबई शहरातील आरोग्य सुविधांसाठी काँग्रेस होणार आक्रमक

शहरातील सर्व खासगी रुग्णालयात काँग्रेस कमिटी प्रत्यक्ष भेट देणार

नवी मुंबई : शहरातील वाढत्या कोरोनाचे संक्रमण आणि यासाठी मनपा मार्फत पुरवल्या जाणाऱ्या सुविधा यासाठी विचारविनिमय करण्यासाठी नेरुळ ब्लॉक काँग्रेस मार्फत बैठकीचे आयोजन रवींद्र सावंत यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.या बैठकीमध्ये कोरोनाचा संसर्ग बळावल्यापासून मनपा आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.रुग्णांना व त्यांच्या नातलगांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.रुग्णांना भर्ती करताना पुरेशा प्रमाणात बेडसचा अभाव,शासनाने निर्देश देऊन देखील अव्वाच्या सव्वा बिल वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयांची मनमानी,कोविड वगळून इतर आजारांना रुग्णालयात कोणती आणि कशी व्यवस्था आहे.खासगी रुग्णालय असणारी व्यवस्था आणि अडचणी यावर उहापोह करण्यात आला.शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ८० टक्के जागा शासकीय दराने खासगी रुग्णालयाने उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने कडक धोरण राबवावे,
कोरोनाबधित रुग्णांचा सांख्यिकी अहवाल सादर होतो त्याच धर्तीवर रुग्णालयातील बेडस संख्या आणि दरपत्रक दर्शनी भागात लावणे आदी पूरक मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
तसेच नवी मुंबई कोविड चा रिपोर्ट जसा रोज जाहिर पालिका करते तसाच रोज किती बेड शिल्लक आहेत ,हॉस्पिटलमध्ये याची पण यादी जाहीर करा अशी मागणी करणार आहोत , याचबरोबर कोविड वगळता शिल्लक बेड्सची पण माहिती दरदिवशी द्यावी.जेणेकरून खासगी रुग्णालय व्यवस्थापनाच्या लुटीला आळा घालता येईल. पारदर्शक कारभारासाठी काँग्रेस पक्ष आक्रमक होणार आहे.वेळप्रसंगी विधायक पद्धतीने दाद मागितली जाणार आहे.टप्प्याटप्प्याने सर्व रुग्णालय आणि त्यांचा कारभार याकडे काँग्रेसची नजर असेल.या अनुषंगाने नेरुळ परिसरातील सर्व खासगी रुग्णालयात काँग्रेस कमिटी प्रत्यक्ष भेट देणार आहे.या विविध मुद्द्यांवर मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली जाणार आहे.या महत्वाच्या बैठकीला जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक ,प्रदेश सचिव ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते संतोष शेट्टी, संतोष सुतार,विजय कुरकुटे, तुकाराम कदम,शेवंता मोरे,विद्या भांडेकर,कल्पेश थोरावडे ,तालुका पदाधिकारी ,विनायक तळेकर ,दिनेश गवळी ,गोविंद साटम ,सुरेश सदावर,प्रल्हाद गायकवाड , घाटे ,राजेश भांबुरे,राधिका कांबळे ,वासंती पुजारी ,आदी हजर होते.

 405 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.