पहिला रूग्ण सापडण्याआधीच पंतप्रधानांना कोरोना संकट माहित होते

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली-मुंबई: देशात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडण्याआधी या संसर्गजन्य आजाराची आणि यामुळे निर्माण होत असलेल्या संकटाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मादी यांना होती असा गौप्यस्फोट केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला.
जावडेकर हे ११ जून रोजी सौराष्ट्र आणि मध्य गुजरातमध्ये ऑनलाईन जनसंवाद रॅलीला संबोधित करत होते.
तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे प्रत्येक कॅबिनेट बैठकीत सगळ्यांना सूचना करत होते असा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला.
तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी पूरेशी तयारी करण्यास सांगत होते. त्यावेळी या आजाराची चाचणी करण्यासाठी फक्त पुणे येथे एनआयव्ही हे एकमेक चाचणी केंद्र होते. मात्र आज देशभरात ८०० चाचणी केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे वक्तव्य सत्य मानल्यास गुजरातमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोन्लाड ट्रम्प यांच्यासाठी जो कार्यक्रम करण्यात आला. त्यामागे कोणते शहाणपण होते. त्यानंतर महाराष्ट्रात ९ मार्चला पहिला रूग्ण तर केरळमध्ये ३० जानेवारीला आढळून येईपर्यत फक्त एकच प्रयोगशाळा पुण्यात होती. मग कोरोनाचे संकट असूनही देशभरात अनेक चाचणी केंद्र का निर्माण करण्यात आली नाहीत? लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होण्याआधीच कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी यांना त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यासाठी आराखडा का तयार केला नाही? तसेच पुरेसे डॉक्टर, नर्स, पीपीई किट, मास्क आदींची व्यवस्था का करण्यात आली नाही? आजाराचा संसर्ग सुरु झाल्यानंतर तब्बल एक महिना या गोष्टींसाठी केंद्र सरकारने घेतल्याचे वेळोवेळीच्या काढण्यात आल्याच्या आदेशावरून दिसते.

 607 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.