तीव्र अस्थिरतेनंतर बाजाराची पुन्हा प्रगती

सेन्सेक्स ०.७२% वाढला तर निफ्टी ९९५० अंकांपुढे

मुंबई : व्यापार सत्रात प्रचंड अस्थिरता अनुभवल्यानंतर बेंचमार्क निर्देशांकांनी व्यापाराच्या शेवटच्या तासात सुधारणा करीत सकारात्मक स्थितीत विश्रांती घेतली. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.७२% किंवा २४२.५२ अंकांनी वाढून ३३,७८०.८९ वर थांबला. तर दुसरीकडे निफ्टीनेही अशीच प्रगती कायम राखत ०.७२% किंवा ७०.९० अंकांनी वाढून ९९५० अंकांवर पोहोचला. जवळपास १२२६ शेअर्स घसरले, १२२४ शेअर्सना नफा झाला तर १५० शेअर्स पूर्वस्थितीत राहिल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.

एमअँड (७.५७%), बजाज फायनान्स (४.६६%), हिरो मोटोकॉर्प (३.९०%), रिलायन्स (३.३२%) आणि बजाज ऑटो (२.८९%) हे बाजारातील टॉप गेनर्स ठरले. रिलायन्स इंडस्ट्रीज हे आजच्या दिवसातील सर्वात सक्रीय शेअर्स ठरले. डीएचएफएल (४.८९%), इंड्युरन्स टेक्नोलॉजीज (४.७८%), झी एंटरटेनमेंट (४.५५%), एआयए इंजिनिअरिंग लिमिटेड (४.३६%) आणि रिलायन्स पॉवर लिमिटेड (४.०९%) हे बाजारातील प्रमुख नुकसानकारक शेअर्स ठरले.

जागतिक बाजारपेठ सावधगिरगीने व्यापार करत असतानाच अस्थिरही होते. कारण दुस-या लाटेची भीती गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी पाहत आहे. असे असूनही, बाजाराने मागील काही महिन्यांच्या तुलनेत ३०%ते ४०% ची उसळी घेतली. त्यामुळे प्रॉफिट बुकिंगच्या शक्यता नाकारता येत नाही.

जागतिक बाजारपेठ
युरोपियन मार्केटने अमेरिकी फेडरलल रिझर्व्हकडून आर्थिक वास्तविकतेची तपासणी केल्यानंतर घसरण दर्शवली. कोव्हिड१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाल्यानेही हे परिणाम दिसले. लवकरच बाजाराने सुधारणा करत प्रमुख निर्देशांकात हिरवा रंग दर्शवला. यामुळे बाजार सकारात्मक स्थितीत बंद झाला. एफटीएसई १०० चे शेअर्स १.०६ टक्क्यांनी तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स १.२० टक्क्यांनी वाढले.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाची भीती गुंतवणुकदारांमध्ये वाढल्याने जागतिक बाजारपेठाला धक्का बसला. नॅसडॅक ५.२७%, निक्केई२२५ हे ०.७४% नी तर हँगसेंग ०.७३%नी घसरले.

 426 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.