दक्षिण कोकण, रत्नागिरी, सोलापूर, मराठवाडा भागात लवकरच लावणार हजेरी
मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून अरबी समुद्रात मान्सून दाखविणारा कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. त्यामुळे पुढील ४-५ दिवसात मुंबई, पुणेसह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
मान्सून हा दक्षिण कोकण, रत्नागिरीमधून तो मध्य महाराष्ट्रातील ,सोलापूर आणि मराठवाडा येथे लवकरच पोहोचणार असून पुढील ४८ तासात तो राज्यातील बहुतांशी भागात पोहोचेल असा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्र वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
601 total views, 3 views today