सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी तेजीत

सेन्सेक्सने ४० अंकांची वाढ दर्शवली तर निफ्टी ५० इंडेक्सनेही १०,३०० अंकांच्या पुढे मुसंडी मारली.

मुंबई : एसअँडपी बीएसई सेन्सेक्स सोमवारी ८३ अंकांनी वधारला. तो ३४,३७०.५८ अंकांवर थांबला. तर एनएसई निफ्टी २५ अंकांनी किंवा ०.२५ टक्क्यांनी वाढून १०,१६७ अंकांवर थांबला. दुसऱ्या दिवशीच्या या प्रगतीच्या या प्रवाहाचे नेतृत्व इन्फोसिस, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यासारख्या आयटी आणि वित्तीय क्षेत्रातील संस्थांनी केले. सेन्सेक्सने ४० अंकांची वाढ दर्शवली तर निफ्टी ५० इंडेक्सनेही १०,३०० अंकांच्या पुढे मुसंडी मारली. त्यानंतर प्रॉफिट बुकिंग झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.

टॉप मार्केट गेनर्स व लूझर्स: आयटी स्टॉक्सने जास्तीत जास्त नफा कमावला तर त्यानंतर खासगी बँक स्टॉक्सचा क्रमांक लागला. निफ्टी आयटी इंडेक्समध्ये १.८३%ने वाढ होऊन ती १४,८९४.६० च्या पातळीवर गेली. तर निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स ११,५४५.६० अंकांवर थांबली. तिच्यात १.२८% नी वृद्धी झाली. दुसऱ्या बाजूला, निफ्टी मिडिया १.६६% नी कमकुवत ठरला तर निफ्टी फार्माने १.४१ टक्क्यांची वाढ घेत ९,९३९.१० ची पातळी गाठली. आजच्या दिवसातील टॉप मार्केट गेनर्समध्ये गेल इंडिया (७.५%), भारत पेट्रोलियम (७.०३%), अॅक्सिस बँक (६.५%), ओएनजीसी (४.८%), बजाज फायनान्स (४.८%), इंडियन ऑइल (४.४%), टाटा मोटर्स (४.४%), टायटन (४.४%) आणि बजाज फिनसर्व्ह (४.२%) यांचा समावेश झाला. आजच्या व्यापारातील टॉप लूझर्समध्ये झी एंटरटेनमेंट (४.४%), श्री सिमेंट्स (३.९%), इचर मोटर्स (३.४%), महिंद्रा अँड महिंद्रा (२.६%), भारती इन्फ्राटेल (२.४%), सिपला (२.२%), अल्ट्रा टेक सिमेंट (२.१%) आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (१.७%) यांचा क्रमांक लागला.

कच्चे तेल
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे ६० पैशांनी वाढ केल्यानंतर प्रमुख तेल उत्पादकांनी दिवसअखेर कामकाज संपवले. ८३ दिवसांनंतर दरात बदल केले. दिल्लीतील पेट्रोलचा दर ७१.८६ वरून ७२.४६ रुपये प्रति लीटर एवढा करण्यात आला. तर डिझेलच्या किंमती ६९.०० वरून ७०.५९ रुपये प्रति लीटरवर करण्यात आला.

जागतिक बाजारपेठ
मार्चपासून विविध अर्थव्यवस्थांमध्ये सतत संघर्ष सुरू असल्याने गुंतवणूकदार सावध आहेत. युरोपियन बाजारात ब्लू-चिप स्टॉक इंडेक्स ०.५ टक्क्यांनी घसरला आणि अमेरिकन एस अँड पी ५०० फ्यूचर्स ०.१ टक्क्यांनी घटला. दरम्यान, जपानबाहेरील आशिया पॅसिफिक शेअर्सचा एमएससीआयचा व्यापक अंदाज ०.२३ टक्क्यांनी वाढला.

 451 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.