निफ्टी-५० इंडेक्स १.१३%, ११३.०५ अंकांनी वाढून १०,१४२.१५ वाढला
मुंबई : बाजाराच्या सहा दिवसांतील दीर्घ सकारात्मक कामगिरीला ब्रेक मिळाला होता. मात्र शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा तेजी प्राप्त केली. निफ्टी-५० इंडेक्स १.१३% म्हणजेच ११३.०५ अंकांनी वाढून १०,१४२.१५ वाढला. निफ्टीने १० हजार आकड्यांच्या वरच विश्रांती घेतली. दुसरीकडे, सेन्सेक्सने ०.९०% किंवा ३०६.५४ अंकांनी वृद्धी घेऊन तो ३४,२८७.२४ अंकांवर स्थिरावला.
शुक्रवारच्या व्यापारात २०२८ शेअर्सनी वृद्धी घेतली, १३१ शेअर्स स्थिर राहिले आणि ५०५ शेअर्स घसरले. बँक, ऑटो, इन्फ्रा आणि मेटल सेक्टर्स हिरव्या रंगात स्थिरावल्याने बेंचमार्क निर्देशांक उंचावल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले
भारती इन्फ्राटेल (८.३४%), टाटा मोटर्स (१३.६५%), टाटा स्टील (६.१७%), एसबीआय (८.७३%) आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज (५.०१%) हे आजच्या व्यापारातील टॉप गेनर्स ठरले. तर सिपला (०.९२%), बजाज ऑटो (१.३६%), इन्फोसिस (०.४२%), एचयूएल (१.५८%) आणि टीसीएस (१.८४%) हे निफ्टीवरील टॉप लूझर्स ठेवले.
निफ्टी मिडकॅप १.६९% नी वधारला. पीएसयू बँक इंडेक्स ७ टक्क्यांनी वाढला. त्यानंतर मेटल, इन्फ्रा, ऑटो, ऊर्जा सेक्टर्सनी वृद्धी केली. अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाल्याने गुंतवणूकदार सकारात्मक राहिले, त्यामुळे बाजारानेही वेग प्राप्त केला.
जागतिक बाजारपेठ: युरोपियन मार्केटने मागील ट्रेडिंग सेशनमध्ये नकारात्मक कामगिरी केली होती, पण आज ती उंचावली. एफटीएसई एमआयबीने १.५६ टक्क्यांची वृद्धी केली. आज विविध अर्थव्यवस्थांवरील लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्याने जागतिक बाजारपेठेतील गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना दिसून आली. निक्केई २२५ ने ०.७४ टक्क्यांची तर हँग सेंगने १.६६ टक्क्यांची वृद्धी घेतली. तर, नॅसडॅक, जो नेहमी ९८१७.१८ अंकांच्या उच्चांकी पातळीवर असतो, तो ०.६९ टक्क्यांनी घसरला
561 total views, 2 views today