अडीच महिन्यानंतर बाजारपेठा झाल्या खुल्या पहिल्याच दिवशी गर्दी

ठाणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळता शुक्रवार पासून शहरातील प्रमुख बाजारपेठा खुल्या झाल्या. दुकानदारांना साफसफाई करुन दुकाने ग्राहकांच्या सेवेसाठी खुली केली. परंतु सोशल डिस्टेसींगचे पालन करण्यास सांगितले गेले असतांनाही ग्राहकांकडून त्याचे पालन होतांना दिसून आले नाही. तसेच पुस्तकांच्या दुकांनामध्ये, छत्र्यांच्या दुकानांमध्ये काहीशी गर्दी मात्र यावेळी दिसून आली.
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर शहरातील विस्कटलेली अर्थव्यवस्था शुक्रवार पासून सुरु झाली. परंतु येथील अर्थव्यवहार हे सम आणि विषम तारखेलाच सध्या सुरु राहणार आहेत. त्यामुळे सकाळीच बाजारात गर्दी दिसून आली. त्यातही शुक्रवारी वटर्पोणिमा असल्याने अनेक महिलांनी आपल्या पतीसमवेत वाणाचे सामान घेण्यासाठी जांभळी नाका, स्टेशन परिसरात गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे येथे गस्तीवर असलेल्या ठाणो नगर वाहतुक पोलिसांनी दुचाकीवरुन आलेल्या दोघांच्या विरोधात कारवाई केली. अनेक दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. काहींना दंडही ठोठावण्यात आला. दुचाकीवरुन एकालाच जाणो बंधनकारक असतांनाही दोघे जण तेही विना हॅल्मेट जात असल्यानेही ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे पुस्तकांच्या दुकानांमधून वह्या, पुस्तके घेण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर कोरोनामुळे वह्या, पुस्तकांची छपाई थांबली असल्याचे मेसेज फिरत होते. त्यामुळेच ही गर्दी या दुकानांमधून झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी काही वेळेतच ही दुकाने बंद केली. परंतु भाजी मार्केटमध्ये मात्र फारशी गर्दी दिसून आली नाही. तर शहरातील इतर भागातील दुकाने देखील सम, विषम तारखेनुसार सुरु झाल्याचे दिसून आले. तर अनेकांनी पावसाळी रेनकोट आणि छत्र्याघेण्यासाठीही काही दुकांनामध्ये गर्दी केली होती. एकूणच अन लॉकडाऊनचा पहिलाच दिवस थोडासा गोंधळात आणि गर्दीत गेला. त्यामुळे नागरीकांना आता कोरोनाची भिती राहिली नसल्याचेही दिसत होते. यामध्ये केवळ नागरीकांनी तोंडाला मास्क लावून तेवढी खबरदारी घेतल्याचे दिसत होते.

 470 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.