चार ते पाच दिवसात प्रतिबंधित क्षेत्रातील लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण करा

महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

ठाणे : महापालिकेने घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील लोकसंख्येचे घरोघरी जाऊन अथवा त्या क्षेत्रामध्ये फिव्हर क्लिनिक सुरू करून कोणत्याही परिस्थतीत येत्या चार ते पाच दिवसांत ताप सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज सर्व अधिकाऱ्यांना दिले.
कोरोना कोव्हीड परिस्थितीचा प्रभाग समितीनिहाय आढावा सिंघल यांनी व्हिडीओ कॅान्फरन्सींगद्वारे आढावा घेतला. या आढावा बैठकीमध्ये त्यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत किती कोरोना बाधित रूग्ण आहेत, कॅान्टॅक्ट ट्रेसींग प्रभावीपणे होत आहे किंवा नाही, फिव्हर क्लिनिक आणि घरोघरी सर्वेक्षण होत आहे किंवा नाही याचा तपशीलवार आढावा घेतला.
या वेळी सिंघल यांनी पुढील चार ते पाच दिवसांत प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व लोकसंख्येचे कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण पूर्ण करावे आणि या ताप सर्वेक्षणामध्ये ज्या लोकांमध्ये तापसदृष्य लक्षणे आढळून आलेली आहेत त्या सर्व लोकांना महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटर्समध्ये स्थलांतरित करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ती व्यक्ती समुहामध्ये वावरणार नाही आणि कोरोनाचा संसंर्ग पसरविणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना दिल्या.
घरोघरी सर्वेक्षण करण्याकरिता जास्त पथकांची आवश्यकता असल्यास आवश्यकतेप्रमाणे पथकांची संख्या वाढवावी, त्यांच्यासोबत ाक्सीजनचे प्रमाण मोजणारे यंत्र आणि फिव्हर स्कॅनर देण्यात यावे जेणेकरून प्रतिबंधित क्षेत्रातील तापसदृष्य लक्षणे असलेल्या व्यक्तीना क्वारंटाईन करून कोरोनाची साखळी तोडावी असे सांगून महापालिका आयुक्तांनी फिव्हर क्लिनिक, फिव्हर ओपीडी आणि त्या परिसरातील जनरल प्रक्टीशनर्स यांच्याशी समन्वय साधून त्यांच्याकडील तापसदृष्य लक्षणे असलेल्या व्यक्तींनाही क्लारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात यावे असे सांगितले.
त्याचबरोबर मुंबईला जाणाऱ्या लोकांची ताप चाचणी करण्याकरिता आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी जेणेकरून त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होणार नाही याबाबत सर्व परिमंडळ उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी दक्षता घेण्यात यावी असेही महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी शेवटी सांगितले.

 481 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.