ठाणे शहरातील कोरोनाचा धोका वाढतोय

ठाण्यात ‘मास टेस्टींग” कराव्यात, अशी मिलींद पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे : ठाणे शहरातील कोरोनाचा धोका वाढीस लागल्याचे चित्र दिसून येत आहे. एकाच घरातील सहा -सहा जणांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. तरीही, ठाण्यातील चाचण्यांचा वेग काहिसा मंदावला आहे. त्यामुळे आता ठाण्यात कोरोनाच्या चाचण्यांचा वेग अधिक प्रमाणात वाढवावा, अशी मागणी मा. विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मिलींद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
मिलींद पाटील यांनी या संदर्भात राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्यासारख्या सर्व कार्यकर्ते गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या सहकार्याने काम करीत आहोत. गेल्या अडीच -तीन महिन्यांचा ठोकताळा घेतल्यास सध्या कोरोना वाढत आहे. मात्र, चाचण्यांचा वेग घटला आहे. अनेक ठिकाणी तर एकाच घरातील सहा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत आहे. अर्थात एकूण रुग्णांपैकी ८० टक्के हे एसिम्टमॅटीक म्हणजेच लक्षण न दिसणारे रुग्ण आहेत. ठाण्यात झोपडपट्ट्यांची संख्या मोठी आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये आता कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे येथील कोरोनाग्रस्त कोणा-कोणाच्या संपर्कात आला आहे, याचा शोध घेणेही अवघड आहे. या भागात राहणारे लोक हे हातावर पोट भरणारे आहेत. अशा स्थितीमध्ये चाचण्यांना रोखणे म्हणजे ठाण्याला मोठा निर्माण होण्यासारखे आहे. त्यामुळे ठाण्याची हानी रोखायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करुन ठाण्यात ‘मास टेस्टींग” कराव्यात, अशी मागणी मिलींद पाटील यांनी केली आहे.

 431 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.