ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचा उपक्रम
ठाणे : ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिना निमित्त इतिहास कालीन गड किल्यावर ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येते. परंतु यंदा कोरोनामुळे सर्वाना एकत्र येऊन कार्यक्रम करता येणार नाही. यामुळे कुठेही गर्दी न करता आपल्या राहत्या ठिकाणी प्रत्येकाने वृक्षारोपण करा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतिने करण्यात आले आहे.
दरवर्षी ठाणे जिल्ह्यातील इतिहास कालीन गुमतारा किल्ला, माहुली किल्ला येथे ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येते. परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्याने ज्यांना जमेल त्यानी आपल्या अंगणात किंवा कुंडीमध्ये गर्दी न करता, सोसिएल डिस्टन्स पाळून प्रत्येकाने एक वृक्ष लावून आपला वृक्षारोपण करतानाचा एक फोटो 9967175700 या क्रमांकावर पाठवा. आपले फोटो ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठाणच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात येतील. हा उपक्रम सर्व नागरिकाकरिता आहे. ह्यामुळे सर्वांनी ह्यात सहभागी व्हा असे आवाहन ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांनी केले आहे. ह्या उपक्रमाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद देण्यास सुरुवात केली असून संरक्षित रित्या वृक्षारोपण देखील करण्यात येत आहे.
596 total views, 1 views today