महिलांना धान्य,सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त केला उपक्रम

बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापुर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सदस्या अनिसा खान यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. यावेळी क्रांती पष्टे, मनीषा पाटोळे, साक्षि सावंत, रजनी जाधव, सुनीता गायकवाड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

 493 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.