हाँगकाँगमधील आंदोलनाचे सोन्याच्या किंमतीवर पडसाद

आर्थिक अनिश्चिततेमुळे बाजारावर परिणाम झाला असून यामुळे यलो मेटलच्या किंमती वाढल्या

मुंबई : हाँगकाँगमधील आंदोलन तीव्र झाल्याने सोन्याच्या किंमती ०.५६ टक्क्यांनी वाढल्या. या भागात सुरक्षाविषयक कायदे कठोरपणे राबवण्याची चीनची योजना आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगच्या जनतेला प्रतिकार करण्याची व एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेतील बेरोजगारीही हळू हळू वाढत आहे. यामुळे महामारीनंतरचा सुधारणेचा काळ अपेक्षेपेक्षा मोठा असू शकतो हे दिसून येते. आर्थिक अनिश्चिततेमुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला असून यामुळे यलो मेटलच्या किंमती वाढल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले

स्पॉट सिल्वर किंमती ०.६९ टक्क्यांनी वाढून त्या १७.४ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील किंमतीही ०.३५ टक्क्यांनी वाढून ४८,५५८ रुपये प्रति किलोनी वाढल्या.

वाढती मागणी आणि शुद्धीकरण प्रक्रियांमध्ये वाढ झाल्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती २.७ टक्क्यांनी वाढून ३३.७ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या. यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणावाची स्थिती झाकोळण्याचे काम झाले. अमेरिकेतील एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (ईआयए) च्या अहवालानुसार, यू.एस. क्रूड यादीतील अभूतपूर्व वाढीमुळे कच्च्या तेलाचा नफा मर्यादित झाला.

ओपेक आणि सौदी अरेबियाने उत्पादन कपातीचा घेतलेला निर्णय कायम ठेवायचा की नाही याावर बैठकीत चर्चा होणारर आहे. तथापि, आणखी उत्पादन कपातीवर रशियाने नकार दिल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवर दबाव आला. अजूनही जगातील अनेक देशांमध्ये रस्ते आणि हवाई वाहतुकीवर निर्बंध आहेत. त्यामुळे तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्यावर मर्यादा आहेत.

 568 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.