मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियमचे कोव्हीड १९ हॉस्पिटलमध्ये रूपांतर होणार

म्हाडा बनवत असलेल्या १००० बेडसचे कोव्हीड हॅास्पीटलची पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे : मुंब्रा येथील ठाणे महानगरपालिकेच्या मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्यावतीने १००० बेडसचे कोव्हीड हॅास्पीटल उभा करण्यात येणार असून आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी जागेची पाहणी केली.

भविष्यात कोरोना कोव्हीड १९ रूग्णांना बेडस् उपलब्ध व्हावेत यासाठी शहरामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एमएमआऱडीएच्यावतीने १००० बेडसचे कोव्हीड १९ रूग्णालय उभारण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली असून लवकरच ते रूग्णालय कार्यान्वित होणार आहे.
तथापि भविष्यातील गरज लक्षात घेवून मुंब्रा प्रभाग समितीतंर्गत महानगरपालिकेच्या कौसा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्यावतीने १००० बेडसचे कोव्हीड रूग्णालय महाडाच्यावतीने उभे करण्यात येत आहे.
या कोव्हीड १९ ॲाक्सीजनची सुविधा असलेले ५०० बेडस् निर्माण करण्यात येणार आहेत तर १०० बेडसचे आयसीयू युनिट तयार करण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी पाहणी करून रूग्णालयाची उभारणी कशा पद्धतीने होईल याची माहिती घेतली. यावेळी राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक रणजीत कुमार हे ही उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा परिसरात निर्माण होणाऱ्या कोव्हीड १९ रूग्णालयामुळे या परिसरातील रूग्णांची मोठी सोय होणार असल्याचे सांगितले तर गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी या कोव्हीड रूग्णालयामुळे कळवा, मुंब्रा, कौसा आणि दिवा परिसरातील कोव्हीड १९ रूग्णांना दिलासा मिळणार आहे असे सांगितले.
यावेळी नगरसेवक शानू पठाण, राजन किणे, श्रीमती आशरीन इब्राहिम राऊत, शेख जाफर नुमानी अन्वर, परिवहन सदस्य शमीम खान, उप आयुक्त संदीप माळवी, सहा. आयुक्त महेश आहेर, कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी आदी उपस्थित होते.

 418 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.