ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

शिपाई आणि वाहन चालकाला कोरोनाची लागण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या संसर्ग आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग यांच्या जोडीला पोलीस प्रशासन कार्यरत आहे. त्यात पोलीस विभाग व आरोग्य विभागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आता, जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कोरोने शिरकाव केला असल्याचे दिसून येत आहे.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका शिपाईसह वाहन चालकाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यात या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभाग विविध उपाययोजन करीत आहे. त्यात पोलीस विभाग आणि आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याना कोरोनाची बाधा झाली. त्यातील अनेक रुग्णांनी कोरोनावर मात करीत घर वापसी केली. तर, अनेक जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. अशातच याची लागण होण्यासापासून जिल्हा प्रशासनातील कर्मचारी मात्र लांब होते. अखेर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एक शिपाई यांना दहा दिवसापूर्वी त्रास जाणवू लागल्याने त्या दिवसापासून ते रजेवर होते. त्यानंतरही त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांची टेस्ट केली असता, गुरुवारी त्यांचा अहवाल पॉझीटिव्ह आला. तसेच उपजिल्हाधिकारी यांच्या वाहनावरील वाहन चालक यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या दोघांनाही जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच पॉझीटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या शिपाईयांच्या संपर्कात आलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची खबरदारीची उपाययोजना म्हणून टेस्ट करून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रश्सानाच्या वतीने देण्यात आली.

 463 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.