कळवा रुग्णालयामध्ये रुग्णांची होतेय आर्थिक पिळवणूक


तकी चेऊलकर यांचा आरोप


ठाणे : ठाणे माहनगर पालिकेच्या शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये कोरोनाच्या नावाखाली गोरगरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. इतर आजारांसाठी आलेल्या रुग्णांची गरज नसतानाही जबरदस्तीने कोविड टेस्ट करुन घेतली जात आहे. केवळ व्यवसायक करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कळव्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर यांनी केला आहे.
तकी चेऊलकर यांनी ठामपा आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये खाजगी डॉक्टरांमार्फत किडनीचे विकार असलेल्या रुग्णांवर डायलेसिसचे उपचार केले जातात. हे वैद्यकीय अधिकारी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांशी उध्दट वर्तन करीत आहेत. हे रुग्ण डायलेसीस साठी येत असतानाही त्यांना कोरोना चाचणीची सक्ती करण्यात येत आहे. सुमारे तीन ते साडेचार हजार रुपयांची ही चाचणी गरीब रुग्णांना परवडणारी नाही. जर, ही चाचणी केली नाही तर त्यांचे डायलेसीस केले जात नाही. केवळ सबंधीत ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरु आहे. विशेष म्हणजे, या रुग्णालयातील सर्व प्रकारची टेलिफोन यंत्रणा बंद आहे. त्यामुळे मुरबाड,शहापुर या भागातून रुग्णांचा वैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क न झाल्याने त्यांना थेट रुग्णालय गाठावे लागते. मात्र, येथे आल्यानंतर जागा नसल्याचे कारण सांगून त्यांना थेट सायन हॉस्पीटल किंवा के ई एम हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात येते. बर्‍याचदा हे रुग्ण रुग्णवाहिकेमध्येच आपली इहलोकीची यात्रा संपवित आहेत. तसेच, या ठिकाणी केवळ दोनच रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी, डायलेसीससाठीची कोरोना चाचणी सक्ती रद्द करण्यात यावी, टेलिफोन यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी तकी चेऊलकर यांनी ेकेली आहे.

 521 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.