राज्यातील विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांना मिळणार वेतन

माजी आमदार व महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र पवारांच्या मागणीला यश


मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांच्या कडे केला होता पत्रव्यवहार

कल्याण :  कोरोना  लॉकडाउन मुळे सर्वच शाळा बंद असल्यामुळे शासनमान्य शाळेतील सर्व शिक्षकांना व कर्मचारी पगार सुरू असताना विनाअनुदानित राज्यातील इंग्रजी शाळा च्या शिक्षक व कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या सीबीएससी (cbse),  आयसीएसई (icse) आयबी (ib) आणि स्टेट बोर्ड (state board) या शाळांमधील  बऱ्याच शाळांनी आपली मनमानी सुरू केली होती. राज्यातील बहुतांश शाळांनी मार्च , एप्रिल पासून शिक्षकांना पगार देणे बंद केलेले होते त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली होती. या शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद पवार यांनी  मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन देऊन शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी विनंती होती तसेच लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती.. त्यांची दखल घेत शासनाने २७ मे रोजी पत्रक जारी करून राज्यातील विनाअनुदानित शाळांना मधील शिक्षक व कर्मचारी यांना नियमित वेतन देण्यात यावे असे पत्रक काढले आहे. यावर बोलत महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीचे अध्यक्ष  नरेंद्र पवार यांनी राज्यातील लाखो शिक्षकांना शासनाने न्याय दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले तसेच या कामांमध्ये अनिल बोरणारे ,गुलाबराव पाटील ,उदय नाईक ,लक्ष्मण इंगळे,गजानन वाघ ,सागर ढवळे ,महादेव शिरसागर, विजय सिंग ,कृष्णा माळी, स्नेहलता सपकाळ, शुभांगी पवार यांचे सहकार्य भेटले असे सागितले.

 843 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.