सविता घाडगे यांना रौप्यपदक

राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन रांगोळी स्पर्धेमध्ये मिळवले यश
ठाणे : सांगलीतील किरण रांगोळी आर्ट अँड क्लासेस यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी महिलांसाठी खास नॅशनल लेव्हल ऑनलाइन रांगोळी स्पर्धा भरविली होती. या स्पर्धेमध्ये सात राज्यातून १५० महिला कलाकारांमधून ठाणे जिल्ह्यातील सविता घाडगे यांनी रौप्यपदक मिळवून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. त्यांना त्यांचे आई-वडील व कुटुंबीयांची मार्गदर्शन लाभले. ऑनलाइन पद्धतीने जवळपास २४ लाख लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवता आला. स्पर्धकांचे रांगोळी परीक्षण ७० % ऑनलाइन वोटिंग वर तर ३०% परीक्षकांच्या द्वारे परीक्षण करण्यात आले. ऑनलाइन वोटिंग साठी प्रत्येक स्पर्धकाला दहा दिवस देण्यात आले होते.तसेच या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रंगावलीकार महादेव गोपाळे,मुंबई व कलाशिक्षक, रंगावलीकार अमोल शिंदे, सांगली यांनी परीक्षक म्हणून काम केले.
लॉक डाऊन मुळे बऱ्याच महिलांना घरी बसून रांगोळीतून आपला संदेश देशभर पाठवता यावा यासाठीच ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती.
यातून समाजामध्ये जनजागृतीचे काम तर होतेच पण त्याचबरोबर महिलां मधल्या कलागुणांना वाव मिळतो. बऱ्याच महिलांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे बऱ्याच वेळा रांगोळी स्पर्धा मध्ये भाग घेण्याची इच्छा असूनही त्या भाग घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने भरविलेल्या या स्पर्धेसाठी महिलांनी खूप आभार व्यक्त केले.
भारतातून तसेच परदेशातून सविता घाडगे यांच्या यशाबद्दल कौतुक होत आहे.

 436 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.