स्थानिकांना रोजगाराची संधी द्या

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाची मागणी

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सर्वच कारखाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र कारखाने बंद केल्याने कारखान्यात काम करणारे अनेक मजूर आपल्या गावी गेले आहेत. सध्यस्थितीत संचारबंदीचे नियम शिथील करण्यात येत असल्याने गेले दोन महिने बंद असलेले कारखाने देखीलवकरच सुरू होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावी गेलेले मजूर इतक्यात गाववरून परतणे शक्य नाही. नेमका याचाच फायदा घेत डोंबिवली, कल्याण येथील कामात कुशल असणाऱ्या तरूण मंडळींना कारखान्यात नोकरी द्यावी अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे डोंबिवलीचे शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी कामा संघटनेकडे केली आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध उपलब्ध व्हावी याकरिता महाआघाडी सरकारच्यावतीने उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. आमदार तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुध्दा या कारखान्यात मराठी तरुणांना नोकरी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे डोंबिवलीतील कामा या उद्योजक संघनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांची भेट घेउन स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी विविध कारखान्यात उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. कल्याण – डोंबिवली शहरात चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. इतकेच नव्हे तर गवंडी, मेस्त्री तसेच ईलेक्ट्रॉनीकचे काम पाहणारी तरूण मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. डोंबिवली – कल्याण शहरातील झोपडपटट्यांमध्ये देखील साफसफाई करणारे देखील कामगार आहेत. या सर्वांना स्थानीक पातळवीरच नोकरी मिळाली तर शहरातील बेरोजगारी कमी तसेच आर्थिक अवस्था सुधारण्यास हातभार लागेल असे मत अंकुश गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले. तर कामा संघटनेने देखील अनेक स्तरातून अशी मागणी होत असून यावर नक्कीच विचार केला जाईल अशी माहिती दिली आहे

 430 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.