सरकार म्हणते ८ लाख तर रेल्वे म्हणते १५ लाख कामगारांना घरी सोडले

स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्याच्या आकडेवारीवरून गोंधळ

मुंबई : राज्यात विशेषत: मुंबई महानगरातील स्थलांतरीत कामगारांना बिहार, उत्तर प्रदेशमधील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी पोहोचविण्यावरून रेल्वे गाड्या उपलब्ध असणे-नसण्यावरून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकाबाजूला या कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेबरोबरच एसटीने ७ ते ८ लाख जणांना पोहोचविल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. तर पश्चिम रेल्वेने २ मे ते २५ मे अखेरपर्यंत १५ लाख कामगारांना त्यांच्या घरी पोहोचविल्याचा दावा केल्याने नेमकी संख्या किती असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना रेल्वेने ५ लाख आणि एसटीने जवळपास ३ लाख स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरापर्यत, किंवा त्यांच्या राज्यांच्या सीमेवर पोहोचविल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर आणखीही स्थलांतरीत कामगार असून त्यांना पोहोचविण्यासाठी अधिकच्या रेल्वेची आवश्यकता असल्याचे जाहीर केले. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी १२५ रेल्वे गाड्या महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून देत असल्याचे जाहीर करत त्यासाठीच्या याद्या पाठविण्याचे आवाहन केले.
यावरून राजकारण भलतेच रंगले असतानाच पश्चिम रेल्वे विभागाकडून आज एक प्रसिध्दी पत्रक जारी करण्यात आले.
या पत्रकानुसार २ मे २०२० ते २५ मे २०२० या कालावधीत पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, बोरीवली, बांद्रा टर्मिनन्स, वसई रोड येथून एकूण १२ स्पेशल श्रमिक रेल्वे गाड्या चालवित १५ लाख ३१ हजार ५७४ स्थलांतरीत कामगारांना बिहार आणि उत्तर प्रदेश, राजस्थान मध्ये पोहोचविल्याचा दावा केला आहे.

पश्चिम रेल्वेकडून चालविण्यात आलेल्या गाड्या खालीलप्रमाणे-
बांद्रा टर्मिनन्स ते जौनपूर-१
बांद्रा टर्मिनन्स ते जयपूर-१
बांद्रा टर्मिनन्स ते दानापूर-१
बांद्रा टर्मिनन्स ते लखनौ-१
बांद्रा टर्मिनन्स ते मधुबनी-१
बांद्रा टर्मिनन्स ते प्रयागराज-१
बांद्रा टर्मिनन्स ते मोतीहारी कोर्ट-१
बोरीवली ते वाराणसी-१
बोरीवली ते गोरखपूर-२
बोरीवली ते जौनपूर-१
वसई रोड ते जौनपूर-१

 383 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.